करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांसाठी 26 सप्टेंबरचा दिवस म्हणजे एक प्रकारचा सणच. तीनशे पाच वर्षापूर्वी 1715 ला मोगलाईच्या काळात आक्रमकांपासून लपवून श्रीपूजकांच्या घरी लपवलेली अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान झाली. यंदा
कोरोना संकटामुळे हा दिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा झाला. यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंदिरात फुलांची सजावट आणि विविधरंगी रोषणाई करण्यात आली.